श्रीमंत बापाच्या मुलाचा प्रताप, अल्पवयीन मुलीला फिरायला गोव्यात नेऊन अत्याचार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – वडिल मंत्रालायत कामाला असल्याने पैशाच्या जोरावर एका १७ वर्षीय मुलीला गोव्यात फिरायला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी पोलिसांनी तरुणाला गोव्यातून अटक केली आहे.

विवेक आव्हाड असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक हा अल्पवयीन मुलींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना फिरायला नेत असे. त्यानंतर तेथे गेल्यावर तो त्यांच्यावर अत्याचार करत असे. याप्रकऱणी त्याच्यावर यापुर्वी २ गुन्हे उल्हासनगरमधील २ ठिकाणी दाखल आहेत. दरम्यान त्याने पुन्हा एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे अमिष दाखवत तिला गोव्याला नेले.

गोव्यात फिरविल्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी पिडीत मुलीने आपल्या आजीला घडलेला प्रकार फोन करून सांगितला. आजीने तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक पथक गोव्याला पाठवले. त्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली. तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. विवेकवर यापुर्वी २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही महिन्यांपुर्वी जामीनावर बाहेर आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like