अभ्यासाच्या बहाण्याने मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण

पोलिसनामा ऑनलाईन – अभ्यासाच्या बहाण्याने हिमाचल प्रदेशात बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन बहिणीवर भावाने लैंगिक शोषण केले आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडी जिल्ह्यातील उपमंडल सुंदरनगर परिसरातील एका खेड्यात आरोपीने आत्याच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी 9 वीची विद्यार्थिनी आहे. आरोपी भाऊ अभ्यासाच्या बहाण्यानं पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत कुठे वाच्यता करायची नाही, अशी धमकी देखील त्याने पीडितेला दिली होती. पीडिता गरोदर राहिल्यानंतर लैंगिक शोषण झाल्याच खुलासा झाला. मुलीच्या पोटात वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या आईने तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले होते. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे सांगितले. आईने मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली असता तिने घटना सांगितली. पीडितेच्या आईने सुंदरनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. डीएसपी सुंदरनगर गुरबचन सिंह यांनी आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like