पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Minor Girl Rape Case Pune | अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करून एका तरुणाने तिच्याबरोबर असलेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर 2023 रोजी कोथरुड परिसरातील एका बिल्डींगमध्ये घडला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.(Minor Girl Rape Case Pune)
याबाबत 18 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.19) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन साहील अनिल साबळे Sahil Anil Sable (वय-20 रा. कोथरुड मुळ रा. सोलापूर) याच्यावर आयपीसी 376, 506, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच कॉलेजमध्ये शिकतात. ते एकमेकांचे मित्र-मैत्रिण आहेत.
आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला गप्पा मारण्याच्या बहाण्याने कॉलेज जवळ असलेल्या
एका इमारतीत घेऊन गेला. त्याठिकाणी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणून अश्लील वर्तन केले. पीडित मुलीने साहील याला नकार दिला असता आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले. तसेच या बाबत कोणाला काही सांगितले तर मारुन टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
भररस्त्यात तरुणीसोबत असभ्य वर्तन
पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.18) रात्री नऊच्या सुमारास प्रदीप अपार्टमेंटच्या
बाहेरील रोडवर घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्य़ाद
दिली असून पोलिसांनी बाप्पा मृत्युंजय बाबरी Bappa Mrityunjay Babri (वय-33 रा. कर्वेरोड – Karve Raod Pune)
याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट
Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल