अंधश्रध्दा ! आई अन् मावशीनं तांत्रिकाकडे सोपवलं अल्पवयीन मुलीला, वारंवार केला त्यानं ‘बलात्कार’

यमुनानगर : हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एका अल्पवयीन 17 वर्षाच्या मुलीसोबत वाईट कृत्य केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका तांत्रिक बाबाने या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे प्रत्येक वेळी अल्पवयीन मुलीची आई आणि मावशी स्वता अंधश्रद्धेला बळी पडून आपल्या मुलीला रात्रीच्यावेळी तांत्रिकाकडे पाठवत होत्या. तंत्र-मंत्राच्या नावाखाली हा ढोंगी भगत मुलीवर बलात्कार करत होता.

मुलगी आपल्या आईला सर्व सांगत होती, परंतु आई आणि मावशीला हे चुकीचे वाटले नाही. या वाईट कृत्याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा मुलीने आपल्या वडीलांना हे सर्व सांगितले. वडीलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पॉक्सो अ‍ॅक्ट आणि आयपीसी कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तांत्रिक आणि पीडितेच्या आईला अटक केली आहे.

अनेकदा केला बलात्कार
काही दिवसांपूर्वी पोटात वेदना होत असल्याचे मुलीने आईला सांगितल्याने ती अल्ट्रासाऊंड करण्यासाठी तिला घेऊन गेली. रिपोर्टमध्ये मुतखडा असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा याबाबत मुलीच्या मावशीला समजले तेव्हा तिने आपल्या बहिणीला सांगितले की, तिच्या माहेरच्या गावात एक माता भक्त राहतो, ज्याचे नाव सतीश आहे आणि तो या आजारावर औषध देतो. नंतर आई आणि मावशी मुलीला घेऊन सतीशकडे गेल्या, जेथे सतीश उपचार करण्याच्या बहाण्याने सतत मुलीवर बलात्कार करू लागला.

वडीलांनी पोलिसांकडे मागितली मदत
पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी सतीश मुलीच्या आईला रात्री 12 वाजता दिवा लावायला सांगत असे आणि मुलीला वधूसारखे सजवून चूडा भरून आपल्याकडे पाठवण्यास सांगत असे. ज्यानंतर आई आणि मावशी मुलीला मांत्रिकाकडे सोपवत असत. रोज मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात येत होता. पोलिसांनी तांत्रिक सतीश आणि मुलीच्या आईला अटक केली असून दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. मात्र, मावशीला अद्याप अटक झालेली नाही.