अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वारजे परिसरात एका ४५ वर्षीय इसमाने एका १२ वर्षाच्या मुलीला केसाची मालीश करण्याच्या बहाण्याने घरी बोलवून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच तीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी फेटाळून लावला.
आनंद सुरेश ढेणे (रा. वारजे), असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ जुलै आणि त्यापूर्वी एक वर्षाच्या कालावधीत वारजे परिसरात घडली.
[amazon_link asins=’B0798R8SZH,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6a42149-b2bc-11e8-a79f-b388e88a4981′]

पीडित मुलगी आणि ढेणे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. केसाची मालिश करायची आहे, असे सांगून तो तिला त्याच्या घरी घेऊन जायचा. तिच्याशी अश्‍लील चाळे करायचा असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ढेणे याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला.

Advt.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्‍तीवाद अॅड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात