लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील (जिल्हा परभणी ) आनंद नगर तांडा येथे लग्नाचे आमिष दाखवून वय सोळा वर्ष आठ महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पाथरी पोलीसात गुन्हा दाखल झाल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे

या प्रकरणी पिडीतेने पाथरी पोलीसात फिर्याद दिल्याने तिन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी दिनेश बबनराव पवार, आरोपी अमोल बळीराम चव्हाण, गणेश बबनराव पवार यांच्या विरुद्ध कलम 376, 2, भारतीय दंड विधान 34 प्रमाणे, पास्को 4, 6, प्रमाणे गुन्हा नोंद झाल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यातील आरोपींनी पिडीतेस नोव्हेंबर 2018 पासून सतत मागील सहा महिन्या पासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार तिच्या इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पाथरी पोलीस ठाण्यात 30 एप्रिल रोजी रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गुन्हा नोंद करण्यात आला

पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के.बी. बोधगीरे हे करीत आहेत.