माैज-मजा करण्यासाठी महागड्या सायकली चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांना अटक

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

माैज-मजा करण्यासाठी महागड्या सायकलची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अलंकार पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन महागड्या सायकली व एक मोटारसायकल असा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसापूर्वी अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटार सायकल व गिअरच्या महागड्या सायकली चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस चोरीच्या घटनांवर नजर ठेऊन होते. पोलीस शिपाई जावेद शेख व दशरथ कर्णे यांना आपल्या गुप्त खबऱ्या मार्फेत बातमी मिळाली होती की,कोथरुड परिसरात काही अल्पवयीन मुले सायकली चोरुन विकत आहेत. त्यानुसार त्यांनी कोथरुड परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता त्याने काही सायकली अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले. सदर चोरीच्या सायकली विकूण आलेले पैसे तो माैजमजा करण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे.

सदरची कारवाई, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, डेक्कन विभागाचे सह पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते,अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंबरिष देशमुख, गणेश देशमुख, गणेश माने, राजेंद्र सोनवणे,पोलीस नाईक प्रमोद मोहिते, नवनाथ शिंदे, नितीन पडवळ, जावेद शेख, दशरथ कर्णे, यांनी केली.