संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर कोविड सेंटरमध्ये लैंगिक अत्याचार, नराधमांनी बनवला व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोविड सेंटरमध्ये उचारासाठी दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलीवर एका रुग्णाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ करण्यात आला असून, पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

ही घटना दिल्लीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एका अल्पवयीन मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिला कोविंड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होेते. आरोपी तरुणही कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्याच काळात सेंटरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर 15 जुलैच्या रात्री आरोपीने बाथरूममध्ये मुलीवर अत्याचार केला.

मुलीने आणखी एका 19 वर्षाच्या मुलावर या अत्याचाराचा व्हिडीओ बनवल्याचा आरोप केला आहे.या कोविड केंद्राचं व्यवस्थापन इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांकडे असून, त्यांनी या घटनेची दिल्ली पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपींना एम्समध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आरोपींना तुरूंगात पाठवण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.