Homeक्राईम स्टोरीअल्पवयीन मुलाने शिक्षकावरच रोखले रिव्हॉल्व्हर

अल्पवयीन मुलाने शिक्षकावरच रोखले रिव्हॉल्व्हर

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेतील विद्यार्थिनीला फिरायला घेऊन जाणास रोखल्याच्या कारणावरुन शाळेतील एका अल्पवयीन मुलाने शिक्षकावरच रिव्हॉल्व्हर रोखले. एवढ्यावरच न थांबता त्याने त्या मुलीला ठार मारुन पुन्हा माघारी येतो अशी धमकी देखील दिली. हा धक्कदायक प्रकार शिक्षकाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथिदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या मुलांकडे पिस्तूल कोठून आणले, कोणी दिले याचा तपास पोलीस करीत आहेत.

बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी क्लासला येणाऱ्या विद्यार्थिनीला तिच्याच शाळेत शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने मैत्री करण्याचे सांगून तिला डहाणू येथे बोलविले होते, परंतु ही बाब त्या विद्यार्थिनीने क्लास चालविणारे शिक्षकांना सांगितली. त्यांनी तिला डहाणूला जाण्यास व त्याच्याशी मैत्री करण्यास मज्जाव केला. ही बाब कळताच अल्पवयीन मुलाने सोबत चार जणांना घेऊन आला. त्याने शिक्षकास कमरेला लावलेले रिव्हॉल्व्हर दाखवून ‘तू ज्या विद्यार्थिनीस माझ्यासोबत मैत्री करण्यास मनाई केली आहे, तिला मी या रिव्हॉल्व्हरने मारून टाकतो आणि पुन्हा येथे परत येतो’, असे सांगून निघून गेला.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी सापळा रचला. चारजण दोन मोटरसायकलीवरून येऊन खासगी शिक्षकासंदर्भात चौकशी करीत असतानाच त्यांच्यावर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झडप घालून पकडले. चारपैकी तिघांकडे तीन रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसे सापडली. या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक किशोर जगताप, पोलिस उपनिरीक्षक संदीप पोमण, इमानदार व मेहेंदळे तसेच गुन्हा प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार सरदार, पोलीस नाईक कैलास पाटील व विजय ठाकूर, पोलीस शिपाई उमेश वरठा यांनी ही कामगिरी केली.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News