Mira Bhayandar Crime | मिरा भाईंदर मनपातील अभियंत्याच्या कारवर गोळीबार, परिसरात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Mira Bhayandar Crime | मिरा-भाईंदर महानगरापालिकेतील अभियंत्याच्या (engineer) कारवर दिवसाढवळ्या गोळीबार (Mira Bhayandar Crime) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बोरिवली नॅशनल पार्कजवळ (Borivali National Park) घडली आहे. बोरिवली नॅशनल पार्कजवळून जातत असताना अभियंत्याच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक खंबीत (Deepak Khambit) असे गोळीबार झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
यामध्ये खंबीत यांच्या हाताला गोळी लागली असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खंबीत हे मिरा भाईंदर महापालिकेच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला आहे. बाईकवरुन आलेल्या दोघांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि क्राईम ब्रँचकडून (Crime Branch) हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.
मात्र हा गोळीबार कोणी आणि कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनधिकृत फेरीवाल्याने कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला होता.
भाजी विक्रेत्याने पिंगळे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात पिंगळे यांच्या हाताची तीन बोटे तुटली होती.
यानंतर आज (बुधवार) मिरा भाईंदरमध्ये अभियंत्यावर गोळीबार (Mira Bhayandar Crime) झाल्याची घटना घडली आहे.
यामुळे महापालिकेतील कर्मचारी अधिकारी सुरक्षीत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Web Title : Mira Bhayandar Crime | firing on mira bhayander corporation engineers car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Viral Letter | दोन बालकांनी पीएम मोदी आणि सीएमला लिहिले ‘हे’ क्यूट पत्र, सांगितल्या आपल्या अडचणी

Health Insurance Claim Tips | हेल्थ इन्शुरन्स क्लेम करताना ‘या’ 9 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 113 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी