Mira-Bhayandar Firing Case | कनिष्ठ अभियंत्यांनी दिली वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, धक्कादायक कारण आलं समोर

दहीसर : पोलीसनामा ऑनलाइन –  मिरा-भाईंदर महापालिकेतील कार्यकारी अभियंता दीपक खांबीत (Executive Engineer Deepak Khambit) यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी (Mira-Bhayandar Firing Case) पोलिसांनी दोन कनिष्ठ अभियंत्यांसह (junior engineers) सहा आरोपींना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. बदली (Transfer) आणि बढतीमध्ये (promotion) अडथळा आणत असल्याने दोन कनिष्ठ अभियंत्यांनी खांबीत यांना मारण्यासाठी (Mira-Bhayandar Firing Case) 20 लाखांची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याचे मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खांबीत यांची हत्या करण्यासासाठी मिरा-भाईंदर महापालिकेतील (Mira Bhayander Municipal Corporation) कनिष्ठ अभियंत्यांनी यूपीच्या दोघा गुंडांना 20 लाखाची सुपारी दिली होती. खांबीत यांच्यावर गोळीबार (Mira-Bhayandar Firing Case) केला परंतु यामध्ये ते बचावले.
या घटनेनंतर आरोपी मुंबईबाहेर पळून गेले. परंतु पोलिसांनी शिताफीने तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणात आणखी अटकेची कारवाई होईल, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

मिरा-भाईंदर, वसई-विरार महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत हे शासकीय वाहनाने कार्यालयातून घराकडे परतत असताना 29 तारखेला सायंकाळी सहाच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) उड्डाणपुलाखाली त्यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फायरिंग केली होती.
खांबीत यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले होते. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात (Kasturba Marg Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला.

 

यूपीतून दोघांना अटक

पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. आजूबाजूच्या ठिकाणीदेखील कसून शोध घेण्यात आला.
दरम्यान, गोळीबार करणारे दोघे आरोपी यूपीला (UP) पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचे पथक यूपीला रवाना झाले.
पोलिसांनी भधोई (Bhadhoi) येथून अमित सिन्हा (Amit Sinha) आणि गाजीपुरातून (Ghazipur) अजय सिंग (Ajay Singh) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता खांबीत यांची हत्या करण्यासाठी दोन अभियंत्यांनी 20 लाखांची सुपारी दिल्याची माहिती आरोपींनी देऊन गुन्ह्याची कबुली दिली.

हा हल्ला कशासाठी करण्यात आला याबाबत सखोल चौकशी करत असताना याच पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता यशवंत देशमुख (Yashwant Deshmukh)
आणि श्रीकृष्ण मोहिते (Shrikrishna Mohite) यांची नावे पुढे आली.
या दोघांसह राजू विश्वकर्मा (Raju Vishwakarma) आणि प्रदीप फाटक (Pradip Fhatak) यांनाही अटक करण्यात आली.

10 लाख अ‍ॅडव्हान्स

अटक आरोपींपैकी अमित आणि अजय यांच्यावर गुन्हे दाखल असून, तुरुंगात असताना त्यांची ओळख विश्वकर्मा याच्याबरोबर झाली.
विश्वकर्मा हा देशमुख आणि मोहिते यांना ओळखत असल्याने त्याच्या मार्फत दोघांनी अमित आणि अजयला 20 लाखांची सुपारी दिली.
हल्ल्यापूर्वी यातील 10 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यात आले होते.

 

 

…म्हणून दिली सुपारी

देशमुख आणि मोहिते 2004 मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेत रुजू झाले होते.
तेव्हापासून त्यांना कोणत्याही प्रकारची बढती मिळाली नाही.
एवढेच नाही तर बदलीसाठी प्रयत्न करुनही त्यामध्ये अडचणी येत होत्या.
खांबीत हेच बदली आणि बढतीमध्ये खोडा आणत असल्याच्या संशयावरुन त्यांनी आरोपींना सुपारी दिली होती.

 

Web Title :  Mira-Bhayandar Firing Case | The shocking reason given by the junior engineer for the murder of the senior officer came to the fore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ‘ती’ची करून कहाणी ! पुण्यात वणवण फिरून काम न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न; पोलिस अन् अग्नीशमनच्या जवानांनी वाचवलं

Ajit Pawar | ‘माझ्याशी रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरावर छापे टाकले याचं वाईट वाटतं’ – अजित पवार (व्हिडीओ)

Jayant patil | अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत (व्हिडीओ)