Miraj Shivsena Chief Arrested | 20 लाखाच्या चेक चोरी प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख गजाआड, शहरात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीच्या चेकबुकमधून 20 लाखांचा चेक चोरी केल्या प्रकरणात मिरज शहराच्या शिवसेना शहर प्रमुखाला अटक (Miraj Shivsena Chief Arrested) करण्यात आली आहे. मिरज शहरातील एका कंपनीच्या जुन्या चेकबूक पुस्तकातून 20 लाखाचा चेक चोरून त्यातील 15 लाख 17 हजार 205 लंपास केल्याचा आरोप मिरज शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे (Miraj Shivsena Chief Chandrakant Maingure arrested) यांच्यावर आहे. शिवसेना शहर प्रमुखावर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने मिरज शहरात खळबळ उडाली आहे.

मिरज शहरातील गांधी चौकी पोलिसांत (Gandhi Chowki Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चंद्रकांत मैंगुरे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मैंगुरे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मधुकुमार (रा. हनुमान मंदिर, मिरज) यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपीने एन रामकृष्ण नावाच्या कंपनीच्या जुन्या चेकबुकचा वापर करीत ही रक्कम लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच,
त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांचा
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. चंद्रकांत मैंगुरे यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी त्यांना जिल्हा
सत्र न्यायालयात (District Sessions Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची
पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, स्वस्त सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

Bombay High Court | ‘महिलेच्या गुप्तांगामध्ये लिंगाऐवजी बोटांचा वापर करणे हा देखील बलात्कारच’ – मुंबई उच्च न्यायालय

UGC ने युनिव्हर्सिटी अ‍ॅडमिशन 2021-22 च्या परीक्षेसाठी गाईडलाईन्स आणि कॅलेंडर केले जारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Miraj Shivsena Chief Arrested | stole company rs 20 lac check and theft money shiv sena city chief arrested in miraj sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update