आता लफडेबाजांची खैर नाही ! मुलीला छेडलं तर झुमक्यातून निघणार थेट ‘बुलेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांची सुरक्षा आणखी वाढवता यावी यासाठी वाराणसीच्या एका तरुणाने एक अनोखा शोध लावला आहे. श्याम चौरसिया नावाच्या या तरुणाने अशी गोळी तयार केली आहे ज्यातून मिरचीची गोळी बाहेर येईल. यामुळे महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि महिलांना छेडणाऱ्यांना निशाणा बनवून त्यांना पळून लावता येईल.

वाराणसीच्या अशोका इंस्टीट्यूटमध्ये रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटमध्ये प्रभारी म्हणून काम पाहणारे श्याम चौरसिया यांनी हे सुंदर शस्त्र तयार केले आहे. ते म्हणाले की हा झुमका महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी देखील फायदेशीर ठरेल.

देशात महिलासोबत होणारी छेडछाड, दुष्कर्म हे रोखण्यासाठी रिसर्चमध्ये तयार करण्यात आलेले झुमके फायदेशीर ठरतील. महिलांच्या सुरक्षेसाठी हे एक कवचाप्रमाणे काम करेल. कानात घालण्यात येणारे झुमके महिलांचे संरक्षण करेल. यामुळे महिला ना की फक्त स्वत:चे रक्षण करु शकतील तर छेड काढणाऱ्यांना रोखू देखील शकतील.

का स्मार्ट आहे हा झुमका –

हा झुमका महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना रोखण्यात स्मार्ट आहे. हा झुमका फक्त दिसण्यास स्मार्ट नाही तर त्याचे काम देखील स्मार्ट आहे. या झुमक्यातून मिरचीच्या गोळ्या झाडल्या जातील. श्याम चौरसिया म्हणाले की हे एक ‘इव्ह टिचिंग डिवाइस’ आहे. दिसताना हे महिलेच्या दागिण्यासारखे दिसते. या स्मार्ट कानातल्यामध्ये महिलेशी कोणी गैरवर्तन केल्यास मोठा आवाज करण्याची आणि लाल आणि हिरवी मिरची उडवण्याची क्षमता आहे. या झुमक्याला बटन लावण्यात आले आहे, ते दाबल्यानंतर यातून मिरचीची गोळी झाडली जाते.

112 आणि 100 नंबरवर देखील पोहचणार सूचना –

या डिवाइसची खासियत म्हणजे 100 आणि 112 डायलवर तात्काळ सूचना पाठवण्यात येईल. महिलेशी गैरवर्तन होताना जर महिलेने बटण दाबल्यावर 112 आणि 100 इमरजेंसी नंबरवर कॉल लागला जाईल.

ब्लूटूथने जोडण्याची सुविधा –

ही इयररिंग कोणत्याही मोबाइलच्या ब्लूटूथला जोडण्याची सुविधा आहे. या सुविधेमुळे महिला स्वत:ला सुरक्षित समजतील. विशेष परिस्थिती ते ही इयररिंग हातात घेऊन गोळी देखील झाडू शकतात. त्यातून लाल मिरचीची पावडर निघेल.

चार महिन्यात तयार केलेल्या या डिवाइसची विशेषता –

हे डिवाइस तयार करण्यास श्याम चौरसिया यांना चार महिन्याचा कालावधी लागला. याचे वजन देखील खूप कमी असून ते फक्त 45 ग्रॅम आणि 3 इंच रुंद आहे. या इयररिंगमध्ये 3 इंच लांब आणि 5 एमएमची फोल्डिंग बॅरल आहे. जे इयररिंग गनमध्ये फीट करुन महिला गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवू शकते. या इलेक्ट्रॉनिक डिवाइसमध्ये 3.70 वोल्टची बॅटरी लावण्यात आली आहे आणि 2 स्विच आहेत. पहिला स्विच गनची ट्रिगर आहे तर दुसरा स्विच 112 आणि 100 नंबरला कॉल करणारे आहे. हे डिवाइस तयार करण्याचा खर्च फक्त 450 रुपये झाला आहेत.