‘इंटिमेट’ सीन करणं ‘वॉर’ सीनपेक्षाही चॅलेंजिंग, ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्री ‘अनंगशा’नं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मिर्झापूर या वेब सीरिजमधील अभिनेत्री अनंगशा विश्वास हिनं अलीकडेच एका मुलाखीतत पुरुष प्रधान मानसिकतेवर सवाल उपस्थित केले आहेत. तिनं समाजाला तीन प्रश्न विचारले आहेत. बोल्ड सीनसाठी अभिनेत्रींना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर तिनं भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर इंटिमेट सीन करणं हे किती चॅलेंजिंग आहे हेही तिनं सांगितलं आहे.

अनंगशानं पहिला प्रश्न विचारला आहे की, बोल्ड सीनसाठी नेहमी महिलांनाच का ट्रोल केलं जातं. पुरुषही यात सहभागी असतातच ना. त्यांच्यावर कोणीच सवाल उपस्थित करत नाही. दुसरा प्रश्न तिचा असा आहे की, पुरुष अभिनेत्याला यामुळं अपमानाचा सामना का नाही करावा लागत? तिसऱ्या प्रश्नात ती म्हणते, बोल्ड सीन देणं एवढी मोठी गोष्ट का आहे ?” असा सवालही तिनं केला आहे.

बोल्ड सीन शुट करणं किती अवघड असतं हे सांगताना अनंगशा म्हणते, “आपण जेंडरला घेऊन प्रगतीशील व्हिजन अंगिकारलं पाहिजे. पडद्यावर बोल्ड किंवा इंटिमेट सीन शुट करणं एखादा वॉर सीन शुट करण्यापेक्षाही जास्त कठिण आणि आव्हानात्मक आहे.”

पुढे बोलताना अनंगशना म्हणते, “हे अनेकदा समोर आलं आहे की, अभिनेत्रींना बोल्ड सीन दिल्यानंतर खासगी आयुष्यात टीकेला सामोरं जावं लागतं. आपला आवडता रोल केल्यानंतरही लाजिरवाणं वाटतं. लोक हे विसरतात की, अ‍ॅक्ट्रेसं केलेला रोल हा काल्पनिक असतो. भूमिका या समाजाचा आरसा असतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या लोकांच्या विचारसरणीला आपण बदलू शकत नाही.

ट्रोलिंगबाबत बोलताना अनंगशा म्हणते, “मी ट्रोलिंगकडे जास्त लक्ष देत नाही. लैंगिक पक्षपाताबद्दल सकारात्मक बदल घडणं खूप गरजेचं आहे” असंही अनंगशा म्हणाली.

अनंगशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं खोया खोया चांद, लव शव ते चिकन खुराना, बेनी बाबू यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. यातील काही सिनेमे रोमँटीक सिनेमे आहेत. लवकरच ती मिर्झापूर 2 मध्ये जरीना ची भूमिका साकारणार आहे.