Mirzapur Controversy : ‘मिर्झापूर’ च्या निर्मात्यांना दिलासा ! अलाहाबाद हायकोर्टानं दिली अटकेवर स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरिज प्रकरणी आता अलाहाबाद हायकोर्टानं अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टानं दोघांच्या अटकेवर स्थिगिती दिली आहे. इतकंच नाही तर कोर्टानं या प्रकरणी एफआयआर दाखल करणारा आणि राज्य सरकारला नोटीस पाठवत उत्तरही मागवलं आहे.

17 जानेवारी रोजी मिर्झापूर कोतवाली ग्रामीण भागात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. यात मिर्झापूरशी संबंधित कलाकार आणि निर्मत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. याला वैतागून मिर्झापूरमधील कलाकारांनी अलाहाबाद कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. सध्या तरी हायकोर्टानं यावर सुनावणी दिल्यानंतर दोघांच्या अटकेवर स्थगिती दिली आहे.

मिर्झापूरमधील एका रहिवाशानं ही याचिका दाखल केली आहे. यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारा कंटेट रेग्युलेट करण्याची मागणी करण्यात आली आहे. वेब सीरिजमध्ये मिर्झापूर शहराची प्रतिमा मलीन दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर निर्मात्यांवर आयपीसीमधील कलम 295 (A), 505, 67 (A) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जस्टीस एम के गुप्ता आणि जस्टीस वीरेंद्र कुमार यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी देत अटकेवर स्थगिती दिली आहे.