Mirzapur Season 3 | मिर्झापूरचा 3 रा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने दिले संकेत

पोलीसनामा ऑनलाइन : Mirzapur Season 3 | ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजने चाहत्यांना खेळवून ठेवले होते. मिर्झापूरची मोठी फॅन फॉलोइंगदेखील आहे. आता मिर्झापूरच्या पुढच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरिजचे चाहते जरी जास्त असले तरी या तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यामुळे ही सीरिज चर्चेत होती. आता याच सीरिजमधील अभिनेता अली अफजलने (Ali Fazal) नुकतीच एक पोस्ट शेअर केली. या सीरिजचे शूटिंग संपल्याचे पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितले.

 

 

अली फजलने मिर्झापूरच्या संपूर्ण टीमबरोबर चित्रीकरण संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देत म्हटले की, “माझ्या सर्वात प्रिय आणि सर्वोत्कृष्ट टीमला मिर्झापूरच्या जगातील सर्व प्रेम आणि मेहनतीबद्दल धन्यवाद”. मिर्झापूरचा तिसरा भाग हा आधीच्या दोन भागांपेक्षा खूपच वेगळा आहे आणि हा प्रेक्षकांना या दोन भागांपेक्षा जास्त आवडेल, त्याची खात्रीदेखील असल्याचे फजलने म्हटले आहे. (Mirzapur Season 3)

या वेब सीरिजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेने
केली आहे, तर या सीरिजमध्ये अली फझल, दिव्येंदु शर्मा, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी असे अनेक कलाकार
मुख्य भूमिकेत झळकणार आहेत, तर ही वेब सीरिज ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title :-  Mirzapur Season 3 | actor ali fazal completed shooting of mirzapur season 3 shared video with team

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात