जेजुरी येथील सुवर्णस्टार आणि युवा ग्रुपच्या वतीने कोरोना रुग्णांना मिसळ पावचा अल्पोपहार

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक बांधिलकी जपत पुरंदर तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमधील रुग्णांना एक घास आपुलकीचा या भावनेने जेजुरी येथील सुवर्णस्टार आणि युवा ग्रुपच्या वतीने जेजुरी येथील प्रसिद्ध मिसळ पावाचा अल्पोपहार देण्यात आला.

मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे, हे वास्तव वादी विचार अंगीकारुन, तालुक्यातील कोविड युद्ध विरांचा वाढता संघर्ष पाहता, त्यांचे दु:ख दुर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर सकारात्मक आनंद निर्माण होऊन त्यांना कोरोनाशी लढण्याचे बळ मिळावे व या लढाईत आम्ही एकटे नाहीत ही भावना दुर होऊन, या गंभीर महामारीशी संघर्ष करण्याची उर्जा त्यांच्यात निर्माण व्हावी व ते या आजारातुन लवकर बरे व्हावेत. या हेतूने, जेजुरीतील निस्वार्थी भावनेने समाजसेवा करण्याचा वसा जपत , निस्वार्थी भावनेने सेवा देणाऱ्या सुवर्णस्टार सोशल क्लबच्या वतीने सर्व कोविड योध्द्यांना आमरस पुरीच्या आस्वादा नंतर, जेजुरी येथील प्रसिद्ध मिसळ पाव अल्पोपहार चा स्वाद पुरंदर तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये जाऊन दिला आहे.

पुरंदर तालुक्यातील पंचक्रोशीतील वीर, जेजुरी, खळद,शिवरी, दिवे आशा सर्व कोविड सेंटर मध्ये सुवर्णस्टार क्लब व युवा ग्रुपच्या पदाधिकारी यांनी प्रत्येक्ष सर्व सेंटरवर जाऊन, मिसळपावाचे वाटप केले, व सर्व कोविड योद्धानां मिसळपावाचा आस्वाद दिला, मंडळाचे अध्यक्ष रज्जाकभाई तांबोळी, अन्नदान नियोजन प्रमुख उद्योजक व समाजसेवक मनोज मोहिते, प्रितम बारभाई मनोज दरेकर,समिरभाई पानसरे, संगितकला विद्यालय प्रमुख, अमोल बेलसरे, नवनाथ चव्हाण, संजय दिक्षित, शेखर बारभाई, सचिन सातभाई, सलिम तांबोळी, नंदु महाजन, अशोक विरकर, सकट असवलीकर, विजय वाघमारे, कदीर तांबोळी, अमोल खाडे, आप्पा जगताप, सागर मोकाशी, मुन्ना शेख, उद्योजक रवि नवगिरे, सुधीर थोरात विलास कड, बापू गोडसे आदी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने लोकहित कर्तव्य म्हणून हे कार्य सोशल क्लब युवा फाॅऊंडेशन च्या माध्यमातून अविरत चालू ठेवले आहे. एकीच्या बळातुन व आणि मानव सेवेच्या सुविचारातुन सेवाभावी व दुसऱ्याला आनंदी ठेवण्याची वृत्ती अवलंबून जनसेवा युध्दवीर सुवर्णस्टार सोशल क्लब आणि युवा फाऊंडेशन केलेले कार्य कौतुकास्पद आहे. एकीकडे कोरोनाने माणुसकी हारवल्याचे चित्र सर्वत्र असताना वरील युवा वर्गाने व सोशल फाउंडेशन यांनी केलेल्या या सेवाभावी कार्याचे तालुक्यात अभिनंदन होत आहे.