पटना विमानतळावर चर्चेत असणारे IPS अमिताभ ठाकूर यांच्याशी ‘असभ्य’ वर्तन, जबरदस्तीनं फ्लाईटमधून उतरवलं

पटना : वृत्तसंस्था – देशातील प्रामाणिक आणि शिस्तबद्ध आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ ठाकूर यांच्यावर पटना विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले. पटना विमानतळावर त्यांना जबरदस्तीने विमानातून खाली उतरविण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या ठाकूर यांनी सीआयएसएफ जवानांकडे तक्रार केली आहे.

लखनऊ ते कोलकाता येथे इंडिगोच्या विमानात अमिताभ ठाकूर होते. यावेळी, जेव्हा विमान पटना विमानतळावर पोहोचले तेव्हा सीआयएसएफच्या जवानांनी जबरदस्तीने ठाकूर यांना विमानातून खाली उतरवले. या गैरवर्तनामुळे संतप्त झालेल्या अमिताभ ठाकूर कमांडंट विशाल दुबे यांच्याकडे गेले आणि सीआयएसएफ जवानाची तक्रार दाखल केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर मूळचे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आहेत. आयपीएस अधिकारी सोबतच ते राष्ट्रीय आरटीआय फोरमचे संस्थापकही आहेत. अमिताभ यांनी उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेले अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांना धमकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सेवा आचार नियम मोडल्याच्या आरोपावरून त्याला निलंबित करण्यात आले. त्याचवेळी अमिताभ ठाकूर चर्चेत आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/