वैवाहिक जीवन अतिशय ‘आनंदी’ ठेवण्यासाठी ‘या’ 3 गोष्टींना फक्त नाही म्हणा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक वैवाहिक आयुष्यात असे काही क्षण येतात, जे त्यांच्या नात्यावर परिणाम करतात. भांडण हा प्रत्येक नात्यातील महत्वाचा भाग आहे, त्याचा सामना करावाच लागतो. परंतु या गोष्टींपासून दूर राहिल्यास आयुष्यात नेहमीच प्रेमाची भावना राखू शकता. कोणत्या गोष्टी वैवाहिक आयुष्यात त्रास देतात आणि त्यांच्यापासून कसे दूर रहायचे जाणून घेऊया…

१. संशय
नातं खराब करण्यात संशयाची मोठी भूमिका आहे. आजकाल तो चिडलेला असतो, ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतो, तो पूर्वीसारखा राहिला नाही, तो एखाद्या अफेयरमध्ये तर अडकला नाही, असे विचार संशयाला बळ देतात. जेव्हा संशय निर्माण होतो, तेव्हा नात्यात अडचण येऊ लागते.

टिप्स
संशयाचा कोणताही उपचार नाही. जर संशयाचे काही कारण असेल तर त्याच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, ज्यांमुळे नात्यात अंतर निर्माण झाले आहे. आवश्यक असल्यास सल्लागाराची मदत घ्या. मनात शंका ठेवल्यास समस्या सुटणार नाही.

२. काळजी आणि तणाव
करिअर, आरोग्य, आर्थिक स्थितीबाबत चिंता हे आधुनिक जोडप्यांना सर्वाधिक तणावग्रस्त बनवत आहे. काही परिस्थिती नियंत्रित केल्या जाऊ शकतात, काही करू शकत नाही. तणाव आणि चिंता माणसाला थकवते. या गोष्टी जोडीदारासह शेअर न केल्यास धोका देखील असतो. नात्यांमध्ये उत्साह देखील राहत नाही.

टिप्स
जितकी कारणे दुखी राहण्याची आहेत, त्यापेक्षा जास्त कारणे आनंदी राहण्याची आहेत. त्यामुळे सकारात्मक विचारांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या जोडीदाराला पाठिंबा द्या. संबंधांकडे दुर्लक्ष करू नका. एकमेकांशी संघर्ष करण्याऐवजी एकत्र अडचणी सोडवण्यास शिका.

३. राग आणि नाराजी
कोणताही जोडीदार असे म्हणू शकत नाही की, त्यांच्यात कधीही वाद होत नाही. छोट-छोट्या भांडणातून नाती तयार होतात, परंतु जेव्हा संघर्ष दीर्घकाळ चालतो, तेव्हा नात्याच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो. नाराजीमुळे संवाद हरवतो. एकमेकांशी नाराजीमुळे डोकेदुखी, तणाव, निराशा होते आणि नाते खराब होऊ लागते.

टिप्स
भांडण करा, परंतु ज्या प्रकारे पाण्याने भरलेले ढग पाऊस पडल्यानंतर शांत होतात आणि आकाश स्वच्छ होते त्याच प्रकारे मनातून सर्व गोंधळ काढून शांत व्हा. ‘सॉरी’ हा छोटा शब्द कधीकधी संबंध चांगले करतो. थोडे वाकल्यास नाते चांगले होते, तर अहंकार कोठे नेऊन ठेवले याचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही.