International Women’s Day 2020 gift ideas : फक्त युनिकच नव्हे तर खुप उपयुक्त देखील आहेत ‘या’ 5 भेटवस्तू

पोलीसनामा ऑनलाईन : गिफ्ट्स प्रेम व्यक्त करण्याचे बरेच सोपे आणि प्रभावी माध्यम आहेत. त्यामुळे संधी मिळाल्यास कोणीही गिफ्ट्स देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. गिफ्ट मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद हा अनमोल असतो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपणही आपल्या खास स्त्रीसाठी भेटवस्तू देण्याची योजना आखत असाल, तर त्यांना काहीतरी युनिक आणि उपयुक्त भेट द्या.

बांबू : कोणत्याही प्रसंगी गुडलक बांबू भेट म्हणून देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस, व्यवसाय ओपनिंग, अभिनंदनावेळी, धन्यवाद देताना , शांती किंवा प्रेमाचा संदेश देताना गुडलक बांबूचे झाड युनिक पर्याय ठरू शकतो. गुडलक बांबू आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि प्रगतीसाठी शुभेच्छा देतात. फेंगशुईच्या मते गुडलक वनस्पती शांतता, सद्भावना, सुरक्षा आणि उर्जाने परिपूर्ण वातावरण तयार करतात. शुभकामनेचे प्रतीक म्हणून बांबू घरात कोठेही लावता येतो. लाल रिबनमध्ये गुंडाळलेला बांबू वनस्पती जोश आणि उत्कटतेचे प्रतीक आहे. लाल रिबनमध्ये बांधलेले गुडलक वनस्पती इच्छित इच्छा पूर्ण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढवतात.

हेल्थ डिवाइस : एका वयानंतर आरोग्याशी संबंधित समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत घरातील स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित उपकरणे भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आजकाल अनेक प्रकारची हेल्थ मॉनीटरिंग डिवाइस उपलब्ध आहेत, ज्याच्या साहाय्याने घर, ऑफिसमध्ये कुठेही बसून आरोग्यावर नजर ठेवता येते.

हेल्दी हर्ब्स : निरनिराळ्या प्रकारच्या सुंदर कुंड्यांमध्ये निरोगी औषधी वनस्पती गिफ्ट करण्याचा विचार देखील सर्वोत्तम आहे. घर सजावटीपेक्षा या औषधी वनस्पती स्वयंपाकात वापरल्या जाऊ शकतात. तुळस, पाइन अ‍ॅपल सेज, ऑरिगेनो, सिलॉन्ट्रो सारखे औषधी वनस्पती आपल्याला फ्रेश आणि सक्रिय ठेवतात.

फ्रुट बास्केट : दागिने, कपडे, सौंदर्यप्रसाधने प्रत्येक स्त्रीला आकर्षित करतात, परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे चांगले आरोग्य. म्हणून आपल्या जवळच्या आणि प्रिय महिलांना हंगामी फळांसह त्या फळांचा बास्केट जे बाजारात सहसा खरेदी करणे शक्य नसते. जसे कि, कीवी आणि एवोकॅडो. व्हिटॅमिन सी, फायबर आणि बरेच पौष्टिक पदार्थ असलेली फळे त्वचेपासून केसांपर्यंत प्रत्येकासाठी खूप फायदेशीर असतात.

स्पा व्हाउचर : आपण आपल्या खास मित्र आणि नातेवाईकांना स्पा कूपन भेट देऊ शकतात, जे त्यांना खूप आवडतील. कारण व्यस्त जीवनशैलीमुळे आपण केवळ स्पा जाण्याची केवळ योजना आखतो, परंतु जेव्हा आपण एखाद्याला भेट म्हणून स्पा कूपन देतो, तर नक्कीच ते त्याचा फायदा घेतील. दरम्यान, या व्हाउचर्सची व्हॅलिडिटी जास्त दिवस असावी, जेणेकरून धावपळीतही ते त्याचा फायदा घेऊ शकतील. मसाज शरीराच्या वेदना दूर करण्याबरोबर रिलॅक्स करण्याचे काम करते. त्यामुळे याशिवाय सर्वोत्तम आरोग्यदायी भेट कोणती असेल.