‘या’ धूमकेतूला हजार वर्षांनंतर उघड्या डोळ्यांनी पुन्हा पाहू शकणार लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तसे तर अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे, पण काहीवेळा अंतराळातील काही घटना पृथ्वीवरही त्याचा प्रभाव दाखवतात. अशा बर्‍याच घटना अंतराळात घडतात, ज्या माणसाला कोणत्याही प्रकारे दिसू शकत नाहीत, परंतु १४ जुलैपासून एक अद्भुत घटना घडणार आहे. जी लोक उघड्या डोळ्यांनीही पाहू शकतात. NEOWISE नावाचा धूमकेतू जो एक हजार वर्षात एकदा दिसतो, १४ जुलैपासून आकाशात स्पष्टपणे दिसू शकतो.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहणारे लोक या धूमकेतूला उघड्या डोळ्यांनी पाहू शकतील. म्हणजेच हा NEOWISE धूमकेतू भारतातही दिसेल. १४ जुलैपासून वायव्य आकाशात एक धूमकेतू स्पष्ट दिसेल. हा पुढील २० दिवस सूर्यास्तानंतर सुमारे २० मिनिटांसाठी दिसेल. लोक उघड्या डोळ्यांनी तो पाहू शकतात.

अंतराळ संस्था नासाने मार्चमध्ये आपल्या कॅमेऱ्यात एक विचित्र घटना कैद केली होती. नासाने शोधून काढले की, पृथ्वीपासून २०० मिलियन किलोमीटर अंतरावर एक धूमकेतू आहे, जो खूप दूर असल्याने स्पष्टपणे दिसत नव्हता. ५ जुलैला खगोलशास्त्रज्ञांनी याला ऍरिझोना येथे पाहिले होते. या धूमकेतूचा फोटो खगोलशास्त्रज्ञ फोटोग्राफर ख्रिस यांनी काढला होता. ११ जुलै रोजी सकाळी तो आकाशात सर्वात उंचवर असल्याने दिसून आला नाही.

वैज्ञानिकांच्या मते, धूमकेतू NEOWISE सूर्यापासून ४४ मिलियन किलोमीटर जवळून गेला आहे. तेव्हापासून हा धूमकेतू हळूहळू दररोज क्षितिजाकडे येत आहे. जुलैच्या मध्यभागी तो सूर्यास्तानंतर लगेच दिसून येईल. २२-२३ जुलै रोजी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. २२-२३ जुलै रोजी पृथ्वीपासून त्याचे अंतर केवळ १०० मिलियन किलोमीटर असेल.