‘तिला’ द्यायची होती सायकल परंतु आरडाओरडा केल्याने उडाला एकच गोंधळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – एका महिलेला तिच्या मुलीची जुनी सायकल एका गरजू विद्यार्थीनीला द्यायची असल्याने तिने शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवले आणि घरी निघाली. परंतु भीतीपोटी विद्यार्थीनीने आरडाओरडा करत दुचाकीवरून उडी घेतली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. हे अपहरणनाट्य रंगले. त्यानंतर मात्र महिलेने तिच्या मुलीला सायकल घेऊन शाळेत बोलविल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.

हिराशिवा कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेला तिच्या मुलीची जुनी सायकल गरजू मुलीला भेट द्यायची होती. तिन दुचाकीवरून पिंप्राळा परिसरात हुडको गरजू मुलीचा शोध घेतला. गुरुवारी (दि. ७) दुपारी मुख्य चौकात महिला आल्यावर तिला दोन मुली दिसल्या. महिलेने सायकल नसलेल्या गरजू मुलीबाबत त्यांनी विचारणा केली असता त्यांनी एका मुलीचे नाव सांगितले. शिक्षिकेला विचारणा करीत असतानाच ती सोबत येण्यास तयार झाली. त्या विद्यार्थिनीला दुचाकीवरून आपल्या घराकडे घेऊन निघाली. त्यावेळी दादावाडी परिसरात आल्यावर विद्यार्थिनीने घाबरून थांबवा, थांबवा म्हणत गाडीवरून उडी घेतली आणि एकच गोंधळ उडाला. परिसरातील लोकांनी गर्दी केली. तिचे अपहरण केले जात असल्याचा समज झाला.

काही तरुणांनी त्या महिलेला आणि विद्यार्थिनीला शाळेत नेले. शाळेत आल्यानंतर शाळेचे संचालक आणि इतर शिक्षकवर्ग जमा झाले. विचारपूस केल्यावर त्या महिलेने आपल्या मुलीला सायकल घेऊन शाळेत बोलाविले. सायकल शिक्षकांच्या ताब्यात दिली. त्यानंतर या अपहरणनाट्यावर पडदा पडला.

You might also like