High BP ला घाबरता ? जाणून घ्या याबद्दलचे समज-गैरसमज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजकाल अनेक लोक हे रक्तदाबाच्या समस्येनं परेशान आहेत. यात तरुणांचाही समावेश आहे. बाहेरच्या पदार्थांचं जास्त सेवन, अनियमित जीवनशैलीत, मोबाईलचा अतिवापर आणि कमी झोप घेणं यामुळं अनेक समस्या उद्भवतात. मद्यसेवन, अतिराग, तसेच ताणतणावामुळं बीपीचा त्रास वाढतो हे जरी खरं असलं तरी बीपी हाय किंवा लो होणं याबद्दल लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत.

उच्च रक्तदाबाच्या समस्येला हायपरटेंशन असंही म्हटलं जातं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाला जर वेळेत उपचार मिळाले नाही तर हृदयरोग, स्ट्रोक, हार्ट अटॅक यांची जास्त शक्यता असते. जरी ही एक गंभीर समस्या असलील तरी आपण काही गैरसमजांबद्दल माहिती घेणार आहोत. यातील काही समज तुमच्याही मनात असू शकतात. याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे. यासाठी काळजी करण्याचं काहीही कारण नाही.

उच्च रक्तदाब ही अजिबात सामान्य समस्या नाही. कारण यामुळं हृदय आणि शरीरातील अनेक अवयवांना नुकसान पोहोचत असतं. या आजाराला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. कारण यात कधीही मृत्यू होण्याची शक्यता असते.

2) उच्च रक्तदाबाची समस्या लवकर बरी होत नाही

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर कोणताही उपाय केला तरी लगेच ही समस्या बरी होत नाही. हे खरं असलं तरी उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याआधी थांबवता येऊ शकते. यासाठी हेल्दी लाईफस्टाईल हवी. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहिल. ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करा. मादक पदार्थांचं सेवन करू नका. या पद्धतींचा वापर केला तर तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवू शकता.

3) उच्च रक्तदाबाचा त्रास हा महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त होतो.

रक्तदाबाची समस्या ही महिला असो किंवा पुरुष दोघांना समान प्रमाणात होत असते. वयाच्या चाळीशीनंतर महिलांची मासिक पाळी बंद होण्याच्या मार्गावर असते. अशा वेळी त्यांना रक्तदाबाचा त्रास उद्भवतो.

4) उच्च रक्तदाबाची समस्या जास्त वय असणाऱ्या लोकांनाच उद्भवते.

उच्च रक्तदाब ही एक अशी समस्या आहे जी वयाच्या चाळीशीनंतर चिंतेचं कारण ठरते. परंतु अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, रक्तदाबाची समस्या ही तरुण मुलांनाही तितक्याच प्रमाणात उद्भवते. कारण त्यांचं खाण्या-पिण्याकडं खूप दुर्लक्ष होत असतं. ते जास्त प्रमाणात फास्ट फूड खात असतात. फोनच्या जास्त वापरामुळं ते लवकर झोपत नाहीत. अनेक चुकीच्या समस्यांमुळं रक्तदाबाची समस्या येत असते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.