सावधान : ‘कोरोना’ अपडेटच्या बहाण्याने स्मार्टफोन हॅक करताहेत सायबर भामटे !

नवी दिल्ली : कोरोना काळात प्रत्येकाला या व्हायरसबाबत माहिती हवी आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार कोरोना अपडेटशी संबंधीत टेक्स्ट मॅसेजची लिंक पाठवत आहेत. कोरोना संबंधित बातमी वाचण्यासाठी लोकांनी या लिंकवर क्लिक करताच, मोबाइल किंव गॅझेटमध्ये एक धोकादायक मालवेयर इंस्टॉल होतो. ज्यानंतर फोन हॅकरच्या नियंत्रणात जातो. याद्वारे सायबर गुन्हेगार फसवणूक आणि ब्लॅकमेलचा खेळ खेळतात. याबाबत सावध करत इंटरपोलच्या सायबर युनिटने जगातील सर्व एजन्सीजना अलर्ट केले आहे. दिल्लीत एजन्सीज स्वता सावध होऊन लोकांनाही जागृत करत आहेत.

सुरक्षा एजन्सीज आणि सरकारी संस्थांना एका मालवेयरवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आहे. हा धोकादायक मालवेयर स्वताला कोरोनाबाबत अभ्यास आणि त्याच्याशी संबंधीत माहती देणार्‍या लिंकच्या रूपात दर्शवतो. विशेषकरून तो स्मार्टफोन यूजर्ससाठी मोठा धोका बनला आहे. हा मालवेयर यूजर्सला बनावट मॅसेज पाठवून आपल्या जाळ्यात ओढतो.

एजन्सीजने जारी केली अ‍ॅडव्हायजरी

– कोणताही ईमेल, लिंक, वेबसाइट किंवा फोन कॉलवर थोडाजरी संशय असेल तर त्यापासून दूर राहा.
– अँटीव्हायरस सॉफ्टवेयरसह फोन अपडेट ठेवा. ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी आपले कुटुंब, विशेषता मुलांना शिकवा.
– आपला डिव्हाइस, मेल किंवा अन्य आवश्यक माहितीसाठी मजबूत पासवर्ड आणि बहुस्तरीय पर्यायांचा वापर करा, जेणेकरून अनोळखी व्यक्तीला समजणार नाही.