हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं

फतेहपूर : वृत्तसंस्था – हैदराबाद आणि उन्नावमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच फतेहपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. 18 वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला पेटवून देऊन तो पळून गेला. मुलीला प्रकृती चिंताजनक असून तिला हैलट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नात्याने काका लागत असलेल्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा आरोप तिने आपल्या जबाबात केला आहे. पीडितेने सांगितले की नात्याने काका लागत असलेल्या 22 वर्षीय आरोपीची वाईट नजर तिच्यावर असायची. सदर घटना फतेहपूरमधील हुसैनगंज पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात घडली आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी शनिवारी दुपारी घरी एकटी होती. हे पाहून नात्याने काका लागत असलेला तरुण घरात शिरला व तिच्यावर अत्याचार केले. तिने सदर घटना घरात न सांगण्याची धमकी दिली असता आरोपीने रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.

त्यानंतर मुलगी आरडा-ओरडा करत बाहेर पाळली. गावातील लोक जमले. त्यांनी पोलिसांना कळविले. तसेच रुग्णवाहिकेने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तपासाला सुरुवात केली. महिला पोलिस ठाणेदाराने मुलीची जबाब नोंदवला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like