कौतुकास्पद ! भेटा ‘या’ 4 बहिण-भावांना, सर्वजण झालेत UPSC ची परीक्षा उत्तीर्ण, बनलेत IAS-IPS

प्रतापगढ : पोलीसनामा ऑनलाइन  –   आपल्या कुटुंबात चार आएएस-आयपीएस अधिकारी असल्याची कल्पना आपण करू शकतो का? आपण अशी कल्पना करत असलो तरी प्रत्यक्षात असे घडले आहे. उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबात राहणारे चार भाऊ-बहिण अधिकारी आहेत. याबाबत जाणून घेवूयात…

ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील प्रतापगढमधील मिश्रा कुटुंबातील. या कुटुंबातील सर्व चार भाऊ-बहिण तीन ते चार वर्षांच्या आत युपीएससी सीएसई परीक्षा क्लियर करून आयएएस-आयपीएस अधिकारी बनले.

उत्तर प्रदेशात राहणारे मिश्रा कुटुंबाचे प्रमुख अनिल मिश्रा आपल्या पत्नीसह दोन खोल्यांच्या घरात राहात होते. त्यांची चार मुले आहेत. दोन मुले आणि दोन मुली. ज्यांची नावे आहेत – योगेश, लोकेश, माधवी आणि क्षमा.

अनिल मिश्रा हे ग्रामीण बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची इच्छा होती की, त्यांच्या चारही मुलांनी मोठे होऊन नाव उज्ज्वल करावे.

त्यांनी सुरूवातीपासूनच मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही, तर मुले सुद्धा सुरूवातीपासून अभ्यासात खुप हुशार होती.

सर्व मुले शिक्षणात चांगली होती, अशातच मोठा मुलगा योगेशने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचे ठरवले, ज्यानंतर अन्य भाऊ-बहिणींनी देखील मोठ्या भावाप्रमाणेच तयारी सुरू केली.

चौघांमध्ये मोठे योगेश मिश्रा आहेत. जे रिझर्व्ह लीस्टमध्ये युपीएससी सीएसई 2013 मध्ये निवडले गेले होते. ही अवघड परीक्षा पास करणारे घरातील ते पहिले व्यक्ती होते.

जेव्हा योगेश परीक्षा पास झाले तेव्हा इतर तीन भाऊ-बहिणींना प्रेरणा मिळाली. ज्यानंतर त्यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली.

योगेश मिश्रा आयएएस आहेत. ते कोलकातामध्ये राष्ट्रीय तोफ निर्मितीमध्ये प्रशासकीय अधिकारी होते.

योगेश यांच्यानंतर दुसर्‍या नंबरवर त्यांची बहिण माधवी आहे, जी 2014 मध्ये युपीएससी परीक्षा पास झाली. तिची 62वी रँक होती.

यादरम्यान, योगेश यांचे छोटे भाऊ लोकेश यांचे युपीएससी सीएसई 2014 मध्ये रिझर्व्ह लीस्टमध्ये नाव आले. ज्यानंतर त्यांनी आणखी एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

लोकेश यांनी प्रथम इंडियन इंन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (आयआयटी-डी) तून इंजिनियरिंग पूर्ण केले. लोकेश यांनी सोशयोलॉजी हा विषय मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय म्हणून निवडला होता, कारण त्यांचा मोठा भाऊ योगेशने देखील हाच विषय निवडला होता.

2015 मध्ये, त्याने परीक्षा पास केली आणि 44वी रँक मिळवली. ते आपल्या कुटुंबातील तिसरे सदस्य होते, ज्याने युपीएससी परीक्षा पास केली होती.

चौथ्या नंबरवर आहे क्षमा, जिने 2015 मध्ये युपीएससी परीक्षा पास केली होती. तिची 172वी रॅक आली होती. 2015 हे वर्ष मिश्रा कुटुंबासाठी खुपच शानदार होते, कारण त्याच वर्षी युपीएससी सीएसई लीस्टमध्ये घरातील दोन मुलांचे नाव होते.

क्षमा यांचे सेलेक्शन 2015मध्ये डेप्यूटी एसपी म्हणून झाले. पण त्या समाधानी नव्हत्या, ज्यानंतर त्यांनी 2016 मध्ये पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला. ज्यानंतर त्या आयपीएस बनल्या.

सर्व मुलांच्या यशात आई-वडीलांचे मोठे योगदान आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये योगेश यांनी म्हटले की, आम्ही सरकारी शाळेत शिकत होतो. ज्यामध्ये सुरूवातीपासून आम्हाला शिस्त शिकवली गेली. एका बहिणीने सांगितले होते की, आम्हा बहिण-भावांमध्ये एक-एक वर्षांचे अंतर आहे. आम्ही दोन खोल्यांच्या घरात राहत होतो. ज्यामुळे अभ्यासात अडचण येत होती. मात्र, आम्ही सर्वांनी एकमेकांना अभ्यासात आणि अन्य बाबतीत मदत केली. याच कारणामुळे आम्ही इथपर्यंत पोहचलो.