‘मणिकर्णिका’ चित्रपटातून माझे सीन वगळण्यात आले – मिष्ठी चक्रवर्ती 

मुंबई : वृत्तसंस्था – कंगनाचा ‘मणिकर्णिका’ चित्रपट रिलीज होण्याआधीच दररोज नवीव वादात सापडत होता. आणि रिलीज झाल्यानंतरही या चित्रपटासंबंधी नवीन वाद समोर येत आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर कंगना आणि डायरेक्टर क्रिश यांच्यात सिनेमाच्या क्रेडिट वरून वाद झाले. सिनेमाचे क्रेडिट कंगना घेत असल्याचे पाहून डायरेक्टर क्रिश यांनी तिला चांगलेच सुनावले होते. त्यांचा हा वाद शांत होत नाही तर या चित्रपटातील कलाकार मिष्ठी चक्रवर्तीने कंगनावर गंभीर आरोप केले आहे. सुभाष घई यांच्या ‘कांची’ चित्रपटातून मिष्ठीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मिष्ठीने खुलासा केला आहे की या चित्रपटातील तिची भूमिका एडिट करण्यात आली आहे. आणि यावरून मिष्ठी कंगनावर नाराज आहे. तसेच मिष्ठीने सांगितले या चित्रपटातील सगळ्यांची भूमिका कमी करण्यात आली आहे. जेव्हा या चित्रपटातील भूमिकेसाठी कमल जैन यांनी मला विचारले तेव्हा मी नाही म्हणाले. पण त्यांनी मला सांगितले तुझी भूमिका मोठी आणि महत्वपूर्ण असणार आहे. शिवाय मला डायरेक्टर क्रिश यांच्या सोबतही काम करायचे होते म्हणून मी या चित्रपटात भूमिका करण्याचा निर्णय घेतला.

पण नंतर चित्रपटाचे डायरेक्टर ही बदलले आणि चित्रपटाच्या एडिट दरम्यान माझ्यावर चित्रित झालेले दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात आले. चित्रपटात मी खूप चांगले सीन शूट केले होते पण एडिट दरम्यान माझे हे सीन कापून टाकले आणि माझी भूमिका छोटी करण्यात आली. जर मला माहित असत की कंगना या चित्रपटाचे डायरेक्शन करणार आहे तर मी कधीच हा चित्रपट स्वीकारला नसता. असे मिष्ठी या वेळी म्हणाली.

या आधी कंगनाला कंटाळून अभिनेता सोनू सूद याने मणिकर्णिका चित्रपटातून काढता पाय घेतला होता. सोनूचे ही बरेचसे सीन सूट झाले होते. परंतु अशाच काही कारणाने सोनुने हा चित्रपट सोडला होता.