‘मिस आफ्रिके’च्या केसांना व्यासपीठावरच लागली आग

नायजेरिया :वृत्तसंस्था –नायजेरिया येथे सुरु असणाऱ्या ‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेचा अंतिम सोहळ्यादरम्यान विजेत्या स्पर्धकांच्या नावाची घोषणा एकीकडे सुरु असतांना विजेत्या स्पर्धकांच्या उत्साहासाठी आतिशबाजी करण्यात अली. या अतिशबाजीमुळे स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आग लागल्याची घटना समोर आली आहे.आयोजकांनी प्रसंगावधान राखून आग विझविल्याने होणारी हानी टळली.

कोण होती मिस आफ्रिकेचा किताब पटकावणारी सौंदर्यवती….
‘मिस आफ्रिका’ 2018ची  सौंदर्यस्पर्धा नायजेरिया येथे घेण्यात आली होती या स्पर्धेत डॉरकस कँसिंडेने 2018चा किताब मिळवला. या विजेत्या सौंदर्यवतीच्या नावाची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट आणि अतिशबाजी सुरु झाली. या अतिशबाजीमुळे व्यासपीठावर उभी असणारी स्पर्धेची विजेती म्हणजेच डॉरकस हिच्या केसांना अचानक आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे व्यासपीठावर धावाधाव सुरु झाली. मात्र आयोजकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ हि आग विझविल्याने अनर्थ टाळला. घडलेल्या या प्रकरणानंतर डॉरकसने तिच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी पूर्णपने ठीक आहे. अशा आशयाची पोस्ट केली आहे.