Miss Universe 2021 | उर्वशी रौतेलाला आमंत्रण, आता जज करेल मिस यूनिवर्स कॉन्टेस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Miss Universe 2021 | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या अभिनयासोबतच तिचे सौंदर्य आणि जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. देशातच नाही तर परदेशातही उर्वशीने आपला झेंडा रोवला आहे. नुकताच उर्वशी रौतेलाला दुबईचा (Dubai) गोल्डन विजा मिळाला असून आता पुन्हा एकदा ती परदेशात आपले नाव रोशन करणार आहे. उर्वशीने मिस युनिव्हर्स (Miss Universe 2021) जजचे आमंत्रण मिळवून तिचे नाव आणखी रोशन केले आहे.

मिस युनिव्हर्स 2021 हि स्पर्धा 12 डिसेंबर रोजी होणार असून उर्वशी रौतेला हिला जज म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी (viral bhayani) यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यासोबत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला मिस युनिव्हर्स 2021 च्या (Miss Universe 2021) जजसाठी आमंत्रित करण्यात आले आहे आणि ही बातमी समोर येताच उर्वशीचे चाहते उत्साहित झाले आहेत. उर्वशीचे चाहते तिचे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहेत आणि तिचा अभिमान असल्याचेही बोलत आहेत.

या पोस्टला प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे कि – ‘शेवटी… उर्वशी रौतेलासाठी ही एक मोठी संधी आहे.’ तर एकाने लिहिले – ‘कृपया, ‘फक्त इंडियालाच विजयी कर’ तर काही लोक याबाबत शंका व्यक्त करत आहेत कि उर्वशीला एवढी मोठी संधी कशी मिळाली आहे. उर्वशीने या आधीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच झाले तर ती लवकरच ‘ब्लॅक रोज'(black rose) आणि ‘थिरुतु पायले 2’ (Thiruttu Payale 2) मध्ये दिसणार आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | साखर निर्यातीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय,
जाणून घ्या शेतकर्‍यांवर काय होणार परिणाम

OBC Reservation Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
OBC संवर्गातील 400 जागांवरील निवडणुका स्थगित

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला,
6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का

Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ