दक्षिण आफ्रिकेची ‘सुंदरी’ बनली ‘मिस युनिव्हर्स’

अटलांटा : वृत्त संस्था – दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने यंदाचा मिस युनिव्हर्स पुरस्कार पटकाविला आहे. अमेरिकेतील अटलांटा येथे झालेल्या शानदार समारंभात जगभरातील ९० सौदर्यवतींमध्ये ही स्पर्धा रंगली होती. त्यात सर्वांना मागे टाकत जोजिबिना टूंजी हिने हा पुरस्कार पटकाविला आहे.

भारताकडून वर्तिका सिंह हिने या स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु, ती पहिल्या १० क्रमांकामध्ये स्थान मिळवू शकली नाही. भारताकडून यापूर्वी सुष्मिता सेन, लारा दत्ता, मानुषी छिल्लर यांनी मिस युनिव्हर्स पुरस्कार पटकाविला आहे.

जोजिबिनी टूंजी हिने या स्पर्धेसाठी गोल्डन रंगाचा सुदंर ड्रेस परिधान केला होता. जोजिबिनी टूंजी ने स्पर्धेच्या परिक्षकांच्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली. या उत्तरानेच तिला मिस युनिव्हर्सच्या मुकुटापर्यंत पोहचविले. हा मुकुट तिच्या डोक्यावर ठेवण्यात आला. तेव्हा ती स्वत: रोखू शकली नाही आणि तिला रडु कोसळले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like