Video : वयाच्या ४३ व्या वर्षीही सुष्मिता सेनचा ‘जबरदस्त’ फिटनेस ; पहा ‘बॅक फ्लिप’ व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या फिटनेसला घेऊन सध्या चर्चेत आली आहे. वयाच्या 43व्या वर्षी सुष्मिताने ज्याप्रकारे स्वत:ला फिट ठेवलं आहे, ज्या पद्धतीने ती एक्सरसाईज करते हे सगळंच दखल घेण्यासारखं आहे. सुष्मिताने पुन्हा एकदा जीममधील बॅक फ्लीपचा व्हिडीओ सोशल शेअर केला आहे ज्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BzmEH3BhD9G/?utm_source=ig_embed

सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे  की, ती बॅक फ्लिप मारत पावर रिंग एक्सरसईज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे की, “कंट्रोल हा फक्त भ्रम आहे. बॅलन्स रियल आहे.” सुष्मिता सेन सोशलवर नेहमीच सक्रिय असते. सुष्मिता म्हणते की, “इंस्टाग्रामने चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी मी रस्ता निवडला आहे. मी रियल लाईफमध्ये कशी आहे हे माझं अकाऊंट सांगत असतं.”

https://www.instagram.com/p/BzgaBBUBqWr/?utm_source=ig_embed

सुष्मिता अनेकदा तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबतही जीममध्ये दिसली आहे. दोघांच्या नात्याला घेऊन काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरु होती की, दोघांचं ब्रेकअफ झालं आहे. परंतु सुष्मिताचे काही दिवसांपासूनचे लेटेस्ट फोटो पाहिले तर ब्रेकअपची चर्चा ही केवळ अफवा आहे असे सिद्ध झाले आहे.

https://www.instagram.com/p/BzWJTx-BEMW/?utm_source=ig_embed

तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अनेक दिवस सिनेमांपासून दूर असणारी सुष्मिता लवकरच सिने जगतात पाऊल टाकणार आहे. परंतु तिची ही सुरुवात डिजिटल सिनेमातून होणार आहे. गेल्या एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली होती की, “आता मुली मोठ्या  झाल्या आहेत. मी अॅक्टींग क्षेत्रात पुन्हा पाऊल टाकणार आहे. हो ब्रेक खूप मोठा झाला आहे. म्हणून मी असे म्हणत आहे की, ही सुरुवात आहे.”

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like