‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरची बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’, ‘या’ अभिनेत्याच्या चित्रपटात झळकणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मानुषी छिल्लरनं गेल्या वर्षी मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आणि भारताचं नाव रोशन केलं. चाहत्यांना अनेक दिवसांपासून मानुषीच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रतिक्षा होती. अखेर मानुषी आता यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या सिनेमात मानुषी झळकणार आहे. राजकुमारी संयोगिताची भूमिका तिनं साकारली आहे. पराक्रमी राजा पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी शौर्यगाथा आहे. त्यांनी मोहम्मद घोरीचा 16 वेळा पराभव करून त्याला प्रत्येक वेळी जीवनदान दिलं होतं. ही शौर्यगाथा आता पडद्यावर पहायला मिळणार आहे.

सिनेमामतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मानुषी म्हणते, “यशराज फिल्मनं नायिका माझी निवड केली हा माझा मोठा सन्मान आहे. या प्रवासात मला जे काही शिकायला मिळणार आहे त्याबद्दल मी प्रचंड आनंदी आणि उत्साही आहे. माझं आयुष्य मला परिकथा वाटतं. मिस इंडिया होण्याचा सन्मान मिळणं. त्यानंतर मिस वर्ल्डचा किताब. आता हा सिनेमा. हे सगळं माझ्यासाठी स्वप्नवत आहे. हा माझ्या आयुष्यातील नवीन आणि रोमांचकारी अध्याय आहे.”

सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, 12 शतकातील भारतातील राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या शौर्यगाथेवर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार महाराजा पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मानुषी त्यांची पत्नी संयोगिताची भूमिका साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. त्यांनी 1991 मध्ये चाणाक्य मालिकेचे लेखन केलं आहे. या शिवाय 2003 मध्ये आलेला उर्मिला मातोंडकरचा पिंजर हा सिनेमाही त्यांनी लिहिला आहे.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like