पोलीसनामा ऑनलाइन – Miss World 2023 India | येत्या वर्षात भारतामध्ये सगळ्या जगभरातील अप्सरा अवतरणार आहे. याचे कारण म्हणजे यंदा 71वा ‘मिस वर्ल्ड’ (71st Miss World) चे यजमान पद भारताकडे आले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात भारतात मिस वर्ल्डची स्पर्धा पार पडणार आहे. याआधी 1996 साली भारतानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आता तब्बल 27 वर्षांनंतर ही स्पर्धा भारतात पार पडणार आहे. (Miss World 2023 India) मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मोर्ले (Julia Evelyn Morley) या मुंबईमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
ज्युलिया एव्हलिन मोर्ले यांनी निवेदन सादर केलं या निवेदनात त्यांनी सांगितले की, “मला सांगायला आनंद होत आहे की, भारत ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या फायनलचं नवे घर असेल. मी भारताला (India) 30 वर्षांपूर्वी भेट दिली होती, त्या क्षणांपासून माझ्यामध्ये भारताबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. आम्ही भारताची विशेष आणि वैविध्यपूर्ण संस्कृती तसेच जगप्रसिद्ध आकर्षणं शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. पुढे त्या म्हणाल्या की, या स्पर्धेसाठी शॉर्टलिस्टेड झालेल्या सुंदरींना एक महिन्यामध्ये 6 विविध टप्पे पार केल्यांनतर ग्रँड फायनलमध्ये (Miss World Grand Final) प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेमध्ये 130 देशातील स्पर्धकांचा समावेश असेल हे सर्व स्पर्धक जगाला आपल्यातील युनिक टॅलेंट दाखवण्यासाठी भारतात दाखल होतील आणि प्रतिष्ठित असा मुकूट (Miss World Crown) जिंकतील.
भारतातील गोवा (Goa) या राज्यात ही स्पर्धा होणार असून याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
(Goa CM Pramod Sawant) यांची मिस वर्ल्डच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांची
पणजी (Panjim,Goa) याठिकाणी भेट झाली आहे.
स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
त्यामुळे गोव्यामध्ये 2023 च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा होईल अशी माहिती मिळत आहे.
ज्युलिया एव्हलिन मोर्ले तसेच 2022 सालच्या मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का
यांची महाष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी देखील भेट घेतली आहे.
भारतासह जगभरातील अनेक सुंदरी आणि मॉडेल्स् या स्पर्धेसाठी कायम उत्सुक असतात.
जगभरातील मिस वर्ल्डचा मुकुट हा प्रतिष्ठेचा समजला जात असून अनेक तरुणी तो पटकवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
यंदा या स्पर्धेचे महत्त्व भारतासाठी अधिक वाढले अजून आयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या देशाकडे असणार आहे.
(Miss World 2023 India)
Web Title : Miss World 2023 India | india set to host miss world 2023 after 27 years india got this chance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune RTO Office News | पुणे : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
- NCP Chief Sharad Pawar | धमक्या देऊन आवाज बंद कराल असे वाटत असेल तर…, शरद पवारांची प्रतिक्रिया