मिस वर्ल्डच्या काँटेस्टनटला येईना H2O ची संज्ञा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
सोशल मीडियावर कोण कसं ट्रोल होईल हे सांगताच येत नाही. ‘मिस वर्ल्ड बांग्लादेश’ या ब्यूटी काँटेस्टच्या स्पर्धकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लहानपणीच रसायनशास्त्रचा चांगला अभ्यास केला असता तर अशी वेळ आली नसती असा काहीसा पश्चाताप या ब्यूटी काँटेस्टच्या स्पर्धकाला आला असेल.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2dbeaec9-c89a-11e8-a2b5-dff3bf533671′]

ट्रोल होण्याचे निमित्त होते ते ‘H2O’. H2O म्हणजे पाणी ही रासायनिक संज्ञा आपल्याला लहानपणा पासून मुखपाठ करुन घेतली जाते. शाळेत रसायनशास्त्राच्या तासाला कठीण रासायनिक संज्ञा पाठ करताना अनेकांच्या नाकी नऊ यायचे. अशीच काहीशीच अवस्था झालीये,’मिस वर्ल्ड बांग्लादेश’ या ब्यूटी काँटेस्टच्या एका स्पर्धकाची. जेव्हा तिला विचारण्यात आले, H2O ही कशाची रासायनिक संज्ञा आहे?’ या प्रश्नाचे उत्तर तिला देता आले नाही. H20 हा पाण्याचा फॉर्म्युला तुलनेने सोपा. सहसा कोणी विसरणार नाही, असा मानला जातो. मात्र ‘मिस वर्ल्ड बांग्लादेश’ या ब्यूटी काँटेस्टमध्ये प्रश्नोत्तराच्या फेरीत सौंदर्यवती या प्रश्नाला अडखळली.

तुम्ही फेसबुक वापरता ? ही काळजी नक्की घ्या

परीक्षकाने प्रश्न पुन्हा विचारला आणि ती प्रश्न घोळवत राहिली, काहीशी हसली. परीक्षक अवाक झाले आणि शेवटी त्यांनीच प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले. यावर तिने सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. ढाक्यातील धानमोंडी मध्ये याच नावाचे रेस्टॉरंट असल्यामुळे मी गोंधळले, असे स्पष्टीकरण तिने बंगालीत दिले. काही वेळातच तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बहुतांश नेटिझन्सनी तिची खिल्ली उडवण्यात धन्यता मानली. कोणी तिच्यात आत्मविश्वास नसल्यावर बोट ठेवले, तर कोणी ती घाबरली असेल, अशा कठीण प्रसंगी कोणीही गांगरते, असे म्हणत तिची बाजू सावरुनही धरली. पण सोशल मीडियावर चर्चा झाली हे खरं…

[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c03365ab-c89b-11e8-95db-8125b8816d66′]