Miss World-Mansa Waransi | मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा तूर्तास स्थगित ! भारताच्या ‘मानसा वाराणसी’सह 17 सौंदर्यवतींना कोरोनाची लागण
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Miss World-Mansa Waransi | जगात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा कोरोनोनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र कोरोनाचं जगभरातील वाढते प्रमाण पाहून, मिस वर्ल्ड 2021 (Miss World 2021) ही स्पर्धा काही ठराविक कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. (Miss World-Mansa Waransi)
मिस वर्ल्ड 2021 या स्पर्धेमध्ये अनेक सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत. तसेच त्यात भारताची सौंदर्यवती मानसा वाराणसी (Manasa Varanasi) हिचा देखील समावेश आहे. परंतु कोरोनामुळं मिस वर्डची स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. लवकरच ही स्पर्धा कधी होईल याची घोषणा केली जाईल.
मिस वर्ल्ड स्पर्धेविषयी अधिकृत माहिती इंस्टाग्रामच्या अकाउंटवर करण्यात आली होती. तर समोर आलेल्या माहितीमध्ये स्पर्धेमधील 17 व्यक्तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यात भारताची सौंदर्यवती मानसा वाराणसीचा देखील समावेश आहे. आरोग्य सुरक्षाविषयक प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही स्पर्धा थांबवण्यात आली आहे. तसेच 90 दिवसांच्या आतमध्ये या स्पर्धेचं वेळापत्रक ठरविले जाणार आहे. स्पर्धेतील सर्व मॉडेल्स आणि कर्मचाऱ्यांची आवश्यक ती काळजी घेतली जात असून, त्यांना आवश्यक अशा उपाययोजना देखील लागू करण्यात आल्या आहेत. (Miss World-Mansa Waransi)
दरम्यान, मानसा वाराणसी ही 2020 मध्ये मिस इंडिया वर्ल्ड
(Miss World 2020 – Manasa Varanasi ) ठरली होती.
तसेच ती तेलंगणामधील इंजिनिअर असून, तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला.
मानसा 23 वर्षांची असून, तिनं मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा किताब पटकावला.
ती सध्या मिस वर्ल्ड 2021 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
Web Title :- Miss World Mansa Waransi | miss world contestant mansa waransi and other 17 contestant covid pisitive
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update