‘ते’ सतत आचारसंहितेचे भंग करत आहेत, मात्र निवडणूक आयोगाचे त्याकडे दुर्लक्ष : माजी निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरैशी यांनी म्हंटले आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित केले. यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्य्यात मतदानासाठी सर्वच पासक जोरदार तयारी करत आहेत. याचदरम्यान, आडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी एक आयएएस अधिकारी गेले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यास निलंबित केले. मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलबंन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे. असे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरैशी यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि त्याकडे निवडणूक आयोग कानाडोळा करताना दिसत आहे. कायदा सर्वांना लागून होतो, मग पंतप्रधान असो वा सामान्य नागरिक. जर हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी कारवाई केली नसती तर निवडणूक आयोग आणि पंतप्रधानमंत्री यांच्यावर होणारी टीका थांबली असती. मात्र, असे झाले नाही, दोघांवरही टीका होत आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी नवीन पटनायक यांच्या डोळ्यासमोर लिकॉप्टरची तपासणी केली. मात्र, नवीन पटनायक यांनी याविरोधात कोणतीही प्रतिक्रिया न देता. अधिकाऱ्यांच्या कामाचा सन्मान केला. तेच खरे राजनेता आहेत आणि आम्हाला अशा राजनेत्यांची गरज आहे. असेही त्यांनी म्हंटले.