फेमिनाच्या कव्हरपेजवर मिसेस CM… !

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ट्विटरवरील  ऍक्टिव्ह मेंबर म्हणून  ओळखल्या जातात . यापूर्वी त्या आपल्या गायनासाठी चर्चेत आलेल्या आता त्या एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आल्या आहेत.

आता फेमिना या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कव्हरवर अमृता फडणवीस झळकल्या आहेत.याची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून दिली  आहे. याआधी फेमिनाच्या कव्हरपेजवर ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मासारख्या प्रसिद्ध अभिनेत्री दिसल्या होत्या. फेमिनासारख्या सुप्रसिद्ध मासिकाच्या  कव्हरपेजवर झळकणे  खरे तर भल्याभल्यांची स्वप्न असते .

खुषखबर…माथेरानची राणी आजपासून पुन्हा रुळावर

फेमिनाच्या या कव्हरवरील फोटोत अमृता फडणवीस यांनी काळ्या रंगाचा गाऊन घातलेला पाहायला मिळतोय. फेमिनाच्या या अंकात अमृता यांची मुलाखतही छापून आली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली आहेत. आपल्या ट्विटद्वारे  त्या म्हणतात, ‘आपण सर्वच फार ग्रेट काही करू शकतो असं नाही, पण आपण छोट्याच गोष्टी फार प्रेमाने करू शकतो.’
दरम्यान, याआधी अमृता फडणवीस यांनी बिग-बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाणं चित्रित केलं होतं. तसंच नदी संवर्धनासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या एका व्हीडिओने तर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. त्या व्हीडिओवर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.