हरवलेला मुलगा चार तासांनी शौचालयात सापडला 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

सार्वजनिक शौचालयात अडकलेल्या चार वर्षांच्या मुलाची वाकड पोलिसांनी सुटका केली. हा प्रकार वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीत घडला. मुळात तो हरवला असल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर लागलीच शोध मोहीम सुरू करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3425510e-c462-11e8-a38f-0b6fd7d5338a’]

आरोस समाधान मस्के (वय ४) असे त्या बालकाचे नाव आहे. सकाळी बाराच्या सुमारास तो घरातून गायब झाला होता काही वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या आईने वाकड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. वाकड पोलिसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करत सापडल्यास वाकड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले.

लाेणी : दुचाकी चोराला अटक, सात दुचाकी जप्त

हा संदेश सर्वत्र व्हायरल होत असताना वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी या चिमुरड्याच्या शोध मोहिसाठी ९० कर्मचारी व १० पोलीस अधिकारी नेमले. यासर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिसरातील ड्रेनेज, पाणी तलाव. सीसी टीव्ही, मोठ्या गटारी, सार्वजनिक शौचालये पालथे घालत वाहने देखील तपासली.

[amazon_link asins=’B076DNSKCN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a193b109-c462-11e8-97e0-69be7a88dbdb’]

या शोध मोहिमेदरम्यान सहायक निरीक्षक संतोष घोळवे व पोलीस नाईक अशोक दुधावने हे दोघे म्हातोबानगर येथील सार्वजनिक शौचालय तपासात असताना त्यांनी एका बंद शौचालयाचा दरवाजा त्यांनी जोराने ढकला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले. त्याच्या पायात शौचालय साफ करण्याचा ब्रश अडकल्याने त्याला दरवाजा उघडता येत नव्हता. यानंतर त्यानेही बराच प्रयत्न केला आणि रडून रडून थकलेल्या त्या आरोसने शांत उभे राहणे पसंत केले. पोलिसांनी त्याला सुखरूप बाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले. यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.