तब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध

पोलिसनामा ऑनलाईन – व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल असलेला अविनाश लोखंडे हा रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल झाल्यावर 15 ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 41 दिवसानंतर त्याला शोधून काढले आहे. पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या नेतृत्वात शहर कोतवाली पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

अमरावती येथील रहिवासी अविनाश लोखंडेवर उपचार सुरू होते. 8 ऑगस्टला अविनाश कोरोनाबाधित झाल्यावर त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, 15 ऑगस्टपासून अकोला जीएमसीमधून तो बेपत्ता झाला. प्रकरण दुर्लक्षित होत असताना शिवराय कुलकर्णी यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. त्यानंतर अकोला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनात कोतवाली ठाण्याचे निरीक्षक उत्तम जाधव यांनी चार जिल्ह्यात अविनाशचा शोध घेतला. मानसिक आजाराने ग्रस्त अविनाशला शोधण्याचे मोठे आव्हान होते. अखेर काल रात्री कोतवाली पोलिसांना अविनाशला शोधून काढण्यात यश आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like