धक्कादायक….बेपत्ता सतरा वर्षाच्या मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरात न सांगता निघून गेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने कार मध्ये बसवून, लॉजवर नेवून लैंगिक अत्याचार करून, विमाननगर परिसरात सोडले. त्यानंतर तिला एका ओला उबेर चालकाने गाडीत बसवून घरी नेले, थोडे दिवस संभाळून तिला मित्राकडे दिले असता मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व या चालकानेही तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार ११ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान घडला आहे. आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c24e546-d290-11e8-bb14-0ba7fea682af’]

अब्दुल अहमद शेख (३३, रा. काटे वस्ती, दिघी) व विजय हनुमंत ननवरे (३०, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) या दोघांना अटक केली आहे. तर एकजण फरार असून पोलीस तपास घेत आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक सतरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती. तर निगडी यमुनानगर येथून एक महिला बेपत्ता झाली असून तिचा शोध निगडी पोलीस घेत होते. दरम्यान निगडी पोलिसांना आळंदी येथून बेपत्ता झालेली मुलगी सापडली. त्या मुलीला आळंदी पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले.

[amazon_link asins=’B00DRLASZ6,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’375b4871-d291-11e8-8cff-394dc75db303′]

महिला पोलिस कर्मचारी व तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन एवढे दिवस कुठे होते अशी विचारपूस केली. त्यावेळी ती राहत्या घरातून पायी चालत विश्रांतवाडी येथे जात असताना तिला रामचंद्र नावाच्या कार चालकाने गाडीत बसवून चंदननगर येथील लॉज नेले व तेथे जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने तिला विमाननगर येथे सोडले. तेथे ओला उबेर कार चालक अब्दुल शेख हा भेटला. त्याने तिची चौकशी करून त्याच्या घरी नेले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01a3731d-d291-11e8-bd12-e7e837b83d6a’]

काही दिवस घरी ठेवून त्याने चक्रपाणी वसाहत भोसरी येथे राहणाऱ्या त्याचा मित्र विजय ननवरे याच्या घरी सोडले. विजय याने त्या मुलीवर दोन दिवस लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी अब्दुल शेख हा मित्रास भेटण्यास आला. त्यावेळी अब्दुल यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी तिला या दोघांनी सोडून दिले, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.आळंदी पोलिसांनी पहिल्या ३६३ च्या गुन्ह्यात भादवि कलम ३६६(अ ), ३७६( ड ) ३४२, ५०६, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४,८ प्रमाणे वाढीव कलमांची नोंद केली आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17d9ca37-d291-11e8-a37d-c32951c80c6c’]