सांगलीतून चार वर्षापूर्वी बेपत्ता झालेली मुलगी सापडली

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरातून २०१४ मध्ये एका सात वर्षांच्या मुलीचे चौघांनी अपरहण केले होते. अपहरणानंतर मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी सापडली नाही. पोलिसांनी मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्य़ादेवरुन चार जणांना अटक केली. परंतु मुलगी सापडली नाही. अखेर सांगली पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा चार वर्षानंतर शोध घेऊन तीला तिच्या काकांच्या स्वाधीन केले.
[amazon_link asins=’B076HYJT12,B06Y5FYBKP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3befe585-b906-11e8-b5d8-db7f7e7633aa’]

दि. 12 मार्च 2014 रोजी शहरातील राजवाडा चौक परिसरात शेजाळ पवार हे त्यांच्या पत्नीसह पुतणीला घेऊन कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी तू आमची माहिती पोलिसांना का देतोस असे म्हणत मारहाण करत त्यांच्या पुतणीचे अपहरण करण्यात आले होते. पन्या महिमान्या काळे, गुंडाबाई काळे, जिज्या काळे, संतोष कांबळे यांनी तिचे अपहरण केल्याची फिर्याद पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर चौघाही संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र अपहृत बालिका सापडली नव्हती.

सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिलींद पाटील यांना अपहृत मुलगी कुपवाड येथे असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने बालिकेची कुपवाड येथून सुटका केली. तिला तिच्या चुलत्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B076HSBF11,B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41ddfe30-b906-11e8-bfc1-3f8f32f9305c’]

निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, संजय पवार, अरूण औताडे, गुंडोपंत दोरकर, महेंद्र साळुंखे, झाकीर काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी