आपण यांना पाहिलंत का ? भाजपा खासदार असलेल्या सनी देओल यांच्याबाबत झळकले ‘पोस्टर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक नेते निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत असतात. असं जनतेचे म्हणणे आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री देखील निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण्यांच्या पदार्पण करत असतात. त्यापैकी काहीजण लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर ही मंडळी आपल्या दैनंदिन व्यापात गुंतून जातात आणि मग त्यांचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते.

अशातच भाजपाच्या तिकीटावर खासदार झालेले सनी देओल हे निवडून आल्यानंतर आपल्या मतदार संघात न फिरकल्याने सनी देओल हरवल्याचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना ८० हजारांहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले होते. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेले सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते.

परंतु ते निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरकल्याने मतदारसंघातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातूनच मतदारसंघातील प्रमुख शहर असलेल्या पठाणकोट येथे सनी देओल हे हरवल्याचे पोस्टर्स लागले आहेत. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/