BJP Kirit Somaiya | आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची किरीट सोमय्यांची पोलिसात तक्रार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Kirit Somaiya |ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) गेल्या शंभर दिवसांपासून बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. भाजप जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी ही तक्रार केली, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि अन्य 50 रहिवाशांनी मानवी साखळी करुन आंदोलन देखील केले. (Kirit Somaiya’s complaint to police that MLA Pratap Saranaik is missing)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

ठाण्यातील वर्तकनगर येथे किरीट सोमय्या, (Kirit Somaiya) आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी पदाधिकाऱ्यांसोबत साखळी आंदोलन केलं. ओवळा माजिवडा मतदार क्षेत्रातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे गेले अनेक दिवस अज्ञातवासात आहेत. ते हरवल्याची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आले होते. तसेच, “प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) गायब असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आहे. ते मातोश्रीमध्ये लपलेत असं बोलल जातय. म्हणून वर्तक नगरच्या मतदारांसह गायब आमदारांची तक्रार नोंदवण्यासाठी इथे आलो आहे. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) मातोश्रीत असतील, तर त्यांना शोधून काढा” अशी मागणी देखील भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलीय.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन दरम्यान मिस्टर इंडिया’ (‘MR. India’) लिहिलेले बॅनर हाती धरले होते. आमदार प्रताप सरनाईकांना (Pratap Sarnaik) मिस्टर इंडिया’ ठरवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. मागच्या शंभर दिवसांपासून प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप केला आहे. तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वर्तकगर पोलीस ठाण्यात प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदवली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : BJP Kirit Somaiya | Kirit Somaiya’s complaint to police that MLA Pratap Saranaik is missing

हे देखील वाचा

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Ajit Pawar । …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार