धक्‍कादायक ! ९ वर्षांपुर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला ‘तो’ तरुण बनला माओवादी कमांडर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ९ वर्षांपुर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी संघटनेत सहभागी झाला असून तो माओवादी कमांडर झाला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. छत्तीसगड पोलिसांनी नुकतीच माओवाद्यांची एक यादी जाहीर केली आहे. राजनंदगाव येथील तांडा एरिया कमीटीचा तो डेप्युटी कमांडर झाला आहे. असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कोण आहे तो तरुण?

संतोष वसंत शेलार उर्प विश्वा असे त्याचे नाव आहे. तो पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाड़ी येथे राहात होता.

पुण्यातून झाला होता बेपत्ता

संतोष शेलार पुण्यातील भवानी पेठ परिसरातील कासेवाडी येथे राहात होता. नोव्हेंबर २०१० मध्ये तो पुण्यातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा बराच शोध घेतला गेला. मात्र तो मिळून न आल्याने जानेवारी २०११ मध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

छत्तीसगड पोलिसांच्या माओवाद्यांच्या यादीत त्याचे नाव

छत्तीसगडमध्ये राजनंदगावमध्ये माओवाद्यांकडून होणार्‍या कारवायांबाबत एक माहिती छत्तीसगड पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे. ती यादी एका इंग्रजी दैनिकाच्या हाती लागली आहे. त्या यादीत एकूण १४ नावे आहेत. त्यात विश्वा (वय २८ निवासी पुणे, महाराष्ट्र) असे त्याच्या नावासमोर लिहिलेले आहे. तो बेपत्ता झाल्यापासून पहिल्यांदाच त्याचे नाव समोर आले असून तो छत्तीसगडमध्ये माओवादी कमांडर झाला असल्याचे उघड झाले आहे.

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई