राज्यातील ३९ लाख नावे मतदार यादीतून वगळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतून वगळलेल्या नावांचा आढावा घेण्यासाठी राज्यात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात राज्यातील ३९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारांनी पुनर्नोंदणी कऱण्यासाठी ‘मिसिंग वोटर्स’ या ॲपवर आपला अर्ज भरावा अशी माहिती फोरम फॉर कॉन्स्टीट्यूशनल नॅशनलिझमचे अध्यक्ष प्रशांत कोठाडिया यांनी दिली.

राज्यातील सुधारित मतदार यादी आणि भारताच्या जनगणनेची आकडेवारी यांचा तुलनात्मक अभ्यास मतदार जागृती परिषद, फोरम फॉर कॉन्स्टीट्यूशनल नॅशनलीझम या संस्थांनी ‘दि वोटर्स बिहाईंड’ आणि ‘रेलॅब्स टेक्नॉलॉजी’च्या सहायाने केला. तसेच नागपूरच्या पश्चिम आणि दक्षिण भाग, तसेच काटोल आणि नांदेड येथेही सर्वे करण्यात आला. त्यात राज्यातील जवळपास ३९ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संस्थांनी मतदारांची पुनर्नोंदणी करण्यासाठी ‘मिसिंग वोटर्स’ या ॲपची निर्मिती करण्यात आली असून ३० मार्चपर्यं नोंदणी करता येईल असे त्यांनी सांगितले.

मतदारांची पुनर्नोंदणी करण्यासाठी ‘मिसिंग वोटर्स’ ॲपची निर्मिती केली आहे. राज्यातील कोणत्याही कारणास्तव मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात आल्यास त्यांनी missingvoters या ॲपवर त्यांच्या नावाची पुनर्नोंदणी करावी. या ॲपमुळे नव्याने ऑनलाइन अर्ज आणि सरकारी कागदपत्रांच्या आधारे नावनोंदणी करता येते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like