Mission Baramati | भाजपच्या मिशन बारामतीचे हात बळकट झाले, सुळे विरुद्ध जानकर लढत होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mission Baramati | भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) परंपरागत चालत आलेल्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी भाजपने (BJP) मिशन बारामती (Mission Baramati) अभियान सुरु केले आहे. भाजपच्या या अभियानाला राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांकडूनच साथ मिळत असल्याची चिन्हे आहेत.

 

राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते (Kashinath Shevate) यांनी इंदापूरमध्ये आयोजित पक्षमेळाव्यात तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजच्या मिशन बारामतीचे (Mission Baramati) हात बळकट झाले आहेत.

 

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती तालुक्याच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत.
त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना जानकार टक्कर देणार असल्याचे चित्र आहे.
महादेव जानकर (Mahadev Jankar) हे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे मानस भाऊ आहेत.

 

बारामती तालुक्यातील लोकसभा मतदार संघाच्या (Lok Sabha Constituency) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून आगामी लोकसभेला महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
कार्यकर्ते आणि संघटनेच्या जीवावर महादेव जानकर यांना बारामतीतून 100% निवडून आणणार,
असा निर्धार रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Mission Baramati | bjp mission 144 rsp mahadev jankar to contest loksabha election 2024 from baramati against ncp mp supriya sule maharashtra political news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chagan Bhujbal | तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून? छगन भुजबळांनी दिले उत्तर, म्हणाले…

Jalgaon Crime | गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 9 जणांना घेतले ताब्यात

Pune Crime  | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR