Mission Majnu | ‘या’ कारणामुळे मिशन मजनू पाकिस्तानमध्ये होत आहे ट्रोल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Mission Majnu | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला तर त्या सिनेमाला विरोध होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी त्या सिनेमाला ट्रोल करतात. असाच एक चित्रपट सध्या ट्रोल होताना दिसून येत आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा मिशन मजनू या चित्रपटाला सध्या ट्रोल केलं जातंय. मात्र भारतात नव्हे तर पाकिस्तानात या चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. (Mission Majnu)

 

‘मिशन मजनू’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे. शंतनू बागचीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात सिद्धार्थसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मिशन मजनू हा चित्रपट 20 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हा गुप्तहेर दाखवण्यात आला आहे. भारताकडून त्याला पाकिस्तानात एक मिशनसाठी पाठवले जाते. तिकडे त्याचे प्रेमप्रकरण जमते, अशी कथा चित्रपटाची आहे. मात्र चित्रपटाला पाकिस्तानातील जनतेने ट्रोल केलं आहे. (Mission Majnu)

 

चित्रपटामध्ये अनेक सीन्समध्ये उर्दू भाषेचा वापर केला आहे आणि यातील बहुतेक शब्द हे चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले आहेत हेच ट्रोल करण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे.
या चित्रपटात सब टायटल्समध्येही उर्दू भाषेतील शब्दांचे चुकीचे स्पेलिंग लिहले गेले आहे.
तर काही उर्दू शब्दांचा चुकीचा अनुवाद लिहला गेला आहे.
बॉलिवूडला उर्दू मजकूर कसा टाईप करायचा हे देखील माहित नाही अश्या शब्दात नेटकरी खिल्ली उडवत आहेत.

 

Web Title :- Mission Majnu | siddharth malhotra and rashmika mandana starter mission majnu film trolled in pakistan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल