रिलेशनशीपबाबत अभिनेत्री सोनाक्षीचा ‘खुलासा’, ‘या’ अभिनेत्यासोबत केलंय ‘डेटिंग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी खूप चर्चेमध्ये आहे. तिचा आगामी चित्रपट ‘खानदानी शफखाना’ प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’मध्ये ती महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच ‘मिशन मंगल’ च्या ट्रेलरला सोनाक्षी सिन्हाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला आणि तिने स्पष्टपणे त्या प्रश्नांचे उत्तर दिले.

काही वर्षांपासून सोनाक्षीच्या पर्सनल लाइफ आणि लग्नाबद्दल काही गोष्टींची चर्चा सुरु आहे. याबद्दल तिला प्रश्न विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की, ती सध्या सिंगल आहे. यानंतर सोनाक्षीने सांगितले की, ती भलेही आज सिंगल आहे पण तिने काही महिन्यांपुर्वी एका अभिनेत्याला डेट केले आहे. सोनाक्षीने त्या अभिनेत्याचे नाव सांगितले नाही पण असे वाटते की, सोनाक्षी त्याला अजून विसरु शकली नाही.

जेव्हा सोनाक्षी सिन्हाला लग्नाबाबतीत प्रश्न केला गेला तेव्हा तिने सांगितले की, तिच्या परिवाराची इच्छा आहे की, तिने एका सुशिक्षित मुलासोबत लग्न करावे. यानंतर तिने सांगितले की, तिला अजून इंडस्ट्रीमध्ये त्या टाइपचा मुलगा भेटला नाही.

सोनाक्षीला विचारले गेले की, जर तिच्या पार्टनरने तिला धोका दिला तर ती काय करेल ? सोनाक्षी म्हणाली की, तो व्यक्ती दुसरा दिवस पाहू शकणार नाही.

‘खानदानी शफखाना’ आणि ‘मिशल मंगल’ चित्रपटाव्यतिरिक्त सोनाक्षी ‘दबंग ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा सोनाक्षी पडद्यावर सलमान खानसोबत रोमॅन्स करताना दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त-