‘मिशन मंगल’ यशस्वी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ‘मिशन मंगल’हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आलाय. भारत सरकारने केलेल्या मिशन मंगल वर आधारित हा सिनेमा होता. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी २७-२८ कोटींची मोठ्ठी कमाई केली आहे.

अक्षय कुमारच्या यादीत आणखी एक देशभक्तीपर चित्रपटाची नोंद करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही चित्रपटानं अव्वल स्थान मिळवलं आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम झाल्यामुळे चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.

boxoffice च्या अधिकृत वेब साईटनुसार गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गोल्ड’ने २३.६७ करोड रूपयांची कमाई केली होती तर, ‘मिशन मंगल’ने पहिल्याच दिवशी २७-२८ करोड रूपयांची कमाई केली आहे.

जगन शक्तीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या वर्षी अक्षय कुमारचे जवळजवळ अजून ३ सिनेमे प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत. मात्र सध्या तरी प्रेक्षकांसह परिवेक्षकही मिशन मंगलचे कौतुक करताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like