फक्त 3 दिवसात अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ 100 कोटीच्या ‘टप्प्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा चित्रपट ‘मिशन मंगल’ ने जोरदार कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांमध्येच मिशन मंगळने ७० कोटींची कमाई केली आहे. लवकरच १०० करोडचाही आकडा पार होईल याची निर्मात्यांना खात्री आहे.

‘मिशन मंगल’ने पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी १५ ऑगस्टला २९.१६ करोड रुपयांची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी कमाई काहीशी कमी झाली १७.२८ करोड आणि तिसऱ्या दिवशी ही कमाई मोठ्या प्रमाणावर वाढली ‘मिशन मंगल’ला शनिवारच्या सुट्टीचा फायदा मिळाला आणि कमाई २३.५८ करोड रुपये झाली. एकंदरीतच पहिल्या तीन दिवसांची कमाई ७०.०२ करोड रुपये झालेली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1162958389539774464

जगन शक्ति दिग्दर्शित चित्रपट देशभरात तीन हजाराहून अधिक स्क्रिनमध्ये रिलीझ करण्यात आला. मिशन मंगल सोबत जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ सुद्धा प्रदर्शित झाला आहे.

बाटला हाऊसने आतपर्यंत ३५.२९ करोड इतकी कमाई केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाची चांगली वाहवा होत असूनही कमाईच्या बाबतीत हा चित्रपट मिशन मंगलच्या अजून बराच मागे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like